¡Sorpréndeme!

Special Report Raj Thackeray & Ashish Shelar | राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीत मिठाचा खडा?

2025-04-21 2 Dailymotion

Special Report Raj Thackeray & Ashish Shelar | राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीत मिठाचा खडा?
Special Report Raj Thackeray & Ashish Shelar | राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीत मिठाचा खडा? 
महाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीचे अनेक किस्से आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार हे एकमेकांचे पक्के मित्र म्हणून ओळखले जातात.  पण आता याच दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा आल्याचं दिसतंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर आशिष शेलारांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला. तेव्हा शेलारांनी अगदी टोकाची प्रतिक्रिया दिली. आणि त्यामुळे या दोघांमधली विरली का? असा प्रश्न उपस्थित झाला. नेमकं काय घडलं? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. 
राज ठाकरे   आणि आशिष शेलार...  या दोन राजकीय नेत्यांच्या मैत्रीत  मिठाचा खडा पडल्याचं दिसतंय... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?  यावरुन सध्या राज्यभरात चर्चा आहे...  याचसंदर्भात पत्रकारानं आशिष शेलारांना प्रश्न केला... 
शेलारांनी थेट टोकाची भाषा केली....  मात्र राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बिनसलं कुठं हे जाणून घेण्यासाठी थोडं भूतकाळात जावं लागेल...  भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोकलं..  त्याला आशिष शेलारांनी उत्तर दिलं...  मग आशिष शेलारांना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडेंमधला कवी जागा झाला.. 
राज ठाकरेंच्या टीकेपेक्षा शेलारांना ज्यांची कविता जास्त जिव्हारी लागली त्या संदीप देशपांडेंनी सध्या संयमी भूमिका घेतलेली दिसते